आनंदी गोपाळ… एक प्रेरणादायी आत्मकथनाचे प्रभावी चित्रिकरण

मी सातवीत असताना आनंदीबाईंचे आत्मचरित्र झपाटल्यासारखे वाचून काढल्याच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. चरित्र वाचत असताना त्या व्यक्तीने केलेला संघर्ष, मिळवलेले यश, त्यासाठी बघितलेले अोंजळभर स्वप्न, ते सत्यात उतरविण्यासाठी केलेले जीवापाड कष्ट या सगळ्या घटना मनावर कायमच्या कोरल्या जात असतात. ते शब्दरुपी धन वाचताना आपल्या डोळ्यांपुढे आपणच त्याचे चित्र साकारत असतो. सिनेमा दिग्दर्शित करत असतो.  … Continue reading आनंदी गोपाळ… एक प्रेरणादायी आत्मकथनाचे प्रभावी चित्रिकरण

अंदमान डायरी दिवस १

अंदमान म्हटलं की मनात येत माझी जन्मठेप, वि.दा.सावरकर, सेल्युलर जेल व क्रिस्टल क्लिअर पाण्यात पहुडलेले रंगीबेरंगी कोरलस्! पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक सागरी साहसे या निळ्याशार समुद्रात वेगवेगळ्या बेटांवर करता येतात. कित्येक वर्षे मनात रंगविलेले अंदमानचे स्वप्न अखेरीस १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१८ ला वीणा वर्ल्डच्या बरोबरीने प्रत्यक्षात साकारले. १० नोव्हेंबरला पहाटे ४:०० वाजता गो … Continue reading अंदमान डायरी दिवस १

मला भावलेले पुस्तक

नादवेध (लेखक: सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले) 'नादवेध ' म्हणजे मनाला भावून स्पर्शून गेलेला संगीताचा एक सुरेख अविष्कार व मनावर कायमचा कोरला गेलेला एक संस्कार आहे.गाण्याविषयीची माझी आवड ही अगदी लहानपणापासूनची. या आवडीबरोबर मैत्री करण्याची संधी मला गांधर्व महाविद्यलयाच्या दिलेल्या परीक्षांमधून, शाळेतील परिपाठाला म्हटलेल्या गाण्यांमधून, समूहगीतांमधून, गायन स्पर्धांमधील सहभागातून, ठाण्यातून पुण्यात येऊन सवाईच्या ऐकलेल्या मैफलीतून अनेकदा मिळाली.पण खरं गाणं मनाच्या जवळ आलं ते त्याला ऐकून. उत्तम कानसेन होण्याचा मग ध्यासच लागला. सहा … Continue reading मला भावलेले पुस्तक

भेट विवेकाची स्मरते

भेट विवेकाची स्मरते अजून त्या क्षणाची धुंद एकांताने दिलेल्या  समृध्द संवेदनांची  विवेकी विचारधनांत  मग गवसत जातो आयुष्याचा अर्थ... फुलत जातात भावना  आणि पसरतो विचार गंध विवेकी विचाराच्या पसायदानाने भारून जाते मनाचे अंतरंग एकतानतेने जोडले जातात जीवाभावाचे मैत्र... या मैत्रीतून बहरते अनुभव विश्व  मिळत जाते ताकद  आकारते कर्म, वितळून जातो दुजाभाव व गळून पडतो अहम्..... जगण्याची … Continue reading भेट विवेकाची स्मरते