या वर्षी मोगरा अजून फुललाचं नाही..... क्षितीजावर मुक्त रंगांची उधळण नाही... स्वरावर साज चढलाचं नाही... असा उदास भाव दाटत असतानाचं, अचानक संवेदना चेताविली अन् मनाची जादुई दुनिया नकळत मोगरा दरवळून मन प्रसन्न करुन गेली........ खरचं दरवर्षी मी या महिन्यात मोगरा फुलायची आतुरतेने वाट बघते. काही वास व त्याच्या आठवणी प्रत्येकाच्याचं मनात घर करुन बसल्या असतात. … Continue reading मोगरामय आठवण
Formula for Happiness
Suicide and Stress
बाकीबाब: मानसशास्त्रीय विश्लेषण
मटा कलासंगममध्ये सलील कुलकर्णींचा बाकीबाब हा बा. भ. बोरकर यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. खूप दिवसांपासूनची ईच्छा पूर्ण झाली. मुळात बोरकर हे काॅलेजमध्ये असताना माझ्या आयुष्यात आले ते आम्ही त्यांच्या कवितांवर आधारित मराठी वाड्ग्मय मंडळात कार्यक्रम केला होता त्या काळात. पुढे मानसशास्त्रात पदवी घेण्यासाठी केलेला अभ्यास देखील कित्येक कवींच्या कविता, त्यातील मानवी मनातील … Continue reading बाकीबाब: मानसशास्त्रीय विश्लेषण
स्वर व साहित्यिक प्रांगणात दरवळलेला प्राजक्तमयी आठवडा:
निमित्त होते स्वरझंकार या कार्यक्रमाचे... वार, गुरुवार, पहिलाच दिवस आणि कार्यक्रमाची सुरुवात राहुल शर्मा यांचे संतुर व साथीला तबल्यावर आमच्या ठाण्याचा मुकुंदराज देव, मुकुंद दादा! त्यांची तबला व संतूर जुगलबंदी संपते ना संपते तोवर जिच्यासाठी स्वरझंकारला जाण्याचा बेत केला त्या सुरेल स्वरशिल्पाचे, अर्थात कौशिकीचे गाणे ऐकण्यासाठी मन आतूर झाले होते... ती कोणता राग, बंदिश, ठुमरी … Continue reading स्वर व साहित्यिक प्रांगणात दरवळलेला प्राजक्तमयी आठवडा:
वर्ष..
वर्षं झरतात ऋुतू सरतात नाती बदलतात दोन मनांमधील अंतरं कधी घडतात तर कधी बिघडतात.... कळत नाही पण काळाप्रमाणे बदलं हाेणारं हे हेचं खरं तर सत्य असतं..... वर्षो न् वर्षे आपण मात्र त्या बदलाचा विचार करण्यात स्विकार करण्यात धडपडत असतो...
मैत्री
तुझ्या माझ्या मैत्रीची सोबत आहे म्हणूनचं आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे आहे रखरखीत वाळवंटात मृगजळाची आशा आहे झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यातून तहान भागवल्याचे समाधान आहे मैत्रीला कोणत्याही बंधनाची सीमा न ठेवता विश्वासाच्या, प्रेमाच्या मार्गाने चालण्याची न संपणारी एक सुंदर पायवाट आहे..... हे मैत्र व तुझी सोबत अशीचं बहरत राहो ही तुझ्या वाढदिवशी मनोकामना आणि तु
सूरसमाधी
तानपुऱ्यावर लावलेला षड्ज आज सतत मनात निनादत होता... कधी भूप, तर कधी यमन अनेक रागरंग चितारत होता.... कधी भैरवीतील कोमल आर्तता तर कधी मल्हार बरसत होता... मनाची तार सप्तकातील सूरांबरोबर जुळवत होता... पण षड्ज मात्र सतत त्याची शांत जागा दाखवत होता मनाची एकतानता जपत होता... असं वाटलं संपूचं नये ही सूरसमाधी अन् मिळत रहावी या … Continue reading सूरसमाधी
रियाजावर काही
तोच तोच पणे जगायला लावणारा दिवस वाटून जातो नवा नवा जेव्हा सुरेल सकाळी सूर जमतो पेटीवर खरा खुरा... उलगडत जातात स्वरांमध्ये दडलेले शब्द, ताल व लय आणि हळूवार वाजायला लागते पेटीवर गीत सुरेल.... उमगतात आपल्याचं मनातील तरल भाव आपल्याला आणि पवित्र करून टाकतात त्या रियाजाच्या क्षणांना...
घडण मनाची
मनाची घडण असते महा जिद्दी सवयी पण असतात तेवढ्याचं हट्टी पण मनाची घडण बदलणं असत सर्वस्वी आपल्याचं हाती..... लागतो तो निर्धार








