OCD/ मंत्रचळ

मन कधी, कसे हरवून जाते स्वत:चं स्वत:ला मिळेनासे होते .... विचार-कृतीतीलं मंत्रचळाचा चाळा शिणवून टाकतो दिवसभर स्वत:ला भविष्यातील चिंता मग दिसू लागते प्रखर.. आणि विचारचक्र फिरत रहाते भरभर ना पूर्ण होतात रोजची कर्मे आणि त्याचं त्याचं कृतीत क्षणाक्षणाचे जीणे बेचैनी, अस्वस्थता कोलमडवून टाकतात... ‘जर तर’ ची वाक्ये भयाच्या खाणीत नेतात... सतत हात धुणे, तपास करणे, … Continue reading OCD/ मंत्रचळ

असुरक्षितता Insecurity

आयुष्याच्या भटकंतीत जेव्हा अनुभवायला मिळते असुरक्षितता तेव्हा मग उद्भवतात प्रश्न अस्तित्वाचे.... कोSहम्?? मी कोण, मला नेमके काय हवयं? आयुष्याचा मक्सद काय? माझा उपयोग काय? याची उत्तरे मिळणे होते कठिण..... अन् माणूस होत असावा अतिसंवेदनशील.... (सुचली तशी उमटली कविता) मानसी

स्मृतीभंश

विस्मृतीच्या शिंपल्यात जेव्हा विरघळून जातात आठवांचे मोती मन होते सैरभैर नावं जातात पुसली बदलतो जगण्याचा अर्थ भावनेचाही होतो अनर्थ धुक्याच्या दुलईत निजतात नाती विचार व कृतीचा ताळमेळचं नाही आयुष्याच्या खात्यातून सुखदु:खांची होते वजाबाकी संवेदना होतात बोथट अन् नजरेत नसते चकाकी रोजचा दिवस सरतो पण काळ, वेळ कळत नाही मी कोण, काय केले, काय करणार? या … Continue reading स्मृतीभंश

एका पावसावर काही…

त्याने ठरवलं की फक्त बरसायचं धरेला घट्ट कवेत घ्यायचं थकल्या मनांना सक्तीचा विसावा द्यायचा आणि घरात बसून पावसाचा आनंद लुटायचा असा बरसायला, मनास मोकळे करायला मुळात येतोच तो वर्षांतून एक वेळेला पण जेव्हा बरसतो तेव्हा चिंब करतो मनाला मग सुचते एखादी कविता, रंगतात गप्पा, जुळतात तानपुऱ्याच्या तारा, सुरेल ऐकू येतो तराणा बरसून हलकं रितं होतं … Continue reading एका पावसावर काही…

मैत्री म्हणजे एक छान मैफिल असते जी आपल्याला समेवर आणते मैत्री म्हणजे एक अशी पायवाट असते जी आपल्याला सुख दु:ख वाटण्याची जागा देते मैत्री एक नाजूक, हळवा बंध असतो जो जवाबदारीची जाणीव शिकवतो मैत्री म्हणजे मनात जपलेलं एक पिंपळपान असतं जे तुमच्या माझ्या मनाच्या पुस्तकात जपलेलं असतं

“विचार प्रक्रियेचे विचारमंथन” – Thinking about Process of Thinking:

Psychologist म्हणून counselling करत असताना आम्हाला operation करावे लागते ते माणूस करत असलेल्या विचारांचे. या विचारचक्रावर अवलंबून असते त्याचे भावना व वर्तन! माणसाची विचार-भावना-कृतीची साखळी brain मध्ये अनुभवातून, शिकण्यातून पक्की बांधली जात असते.When this chain of thought comes into action we start showing our unique reactions to the situations. If we give more or less … Continue reading “विचार प्रक्रियेचे विचारमंथन” – Thinking about Process of Thinking:

मन तू काहे न धीर धरे…

पहिल्या article मध्ये विचार प्रक्रियेचे विचारमंथन यावर लिहिले. आता मनाचा समतोल म्हणजे नेमके काय याविषयी थोडे उलगडलेले, पाहिलेले अनुभव...अर्थात समर्थ रामदास स्वामींनी या मनाच्या समतोलासाठी अनेक उपदेश केले, पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र याचा वापर विरळाच दिसतो. तो वाढण्यासाठी निरोगी मनाची संकल्पना समजून घ्यावी लागते.....मना मानसी दुःख आणू नको रे ।मना सर्वथा शोक चिंता नको रे … Continue reading मन तू काहे न धीर धरे…