OPD

कालच्या OPD (Out Patient Department) मध्ये एका 14 वर्षांच्या just adolescent phase मध्ये वाटचाल केलेल्या मुलीसोबत बोलत असताना तिने केलेले तिच्या स्वभावाचे, परिस्थितीचे व पालकांचे विश्लेषण एका विचारी तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे वाटले.
ही मुलगी परदेशातून 9 yrs. of schooling करून भारतात रुळू बघत होती, आधीच भारतात परत यावे लागले, तेथील मित्र मैत्रिणींपासून लांब जावे लागले ही भावना तिला असह्य होती. IT मधील uncertainty and changing plans याची तिने सवय केली होती.
पालकांना वाटत होते की ही social नाही, भावनिक नाही, आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाही, अभ्यासात खूप हुषार आहे, वाचनाची आवड आहे पण कमी बोलणं, चिडचिडेपणा हा तिच्या वर्तनातील बदल आमच्या नात्यात दुरावा निर्माण करतोय. आजी आजोबांबरोबर देखील ती connect होत नाही,आणि या वयात एवढा राग चांगलाही नाही ना?? आता भारतात येऊनही वर्ष होत आलं, त्यात हिचे वयाचे नाजूक वळण! काळजी वाटते तिची….ही होती नाण्याची पहिली बाजू…
मी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांना बाहेर बसायला सांगून मुलीसोबत संवाद साधण्याची permission मागितली. मुलीबरोबर बोलायला सुरूवात केल्यावर नदीचा बांध फुटून पूर यावा तसा तिच्या मनातील साचलेला प्रश्नरूपी प्रवाह वहायला लागला. मी फक्त ऐकत होते ही नाण्याची दुसरी बाजू…
तिचा पहिला प्रश्न मला सांगा rules काय फक्त मुलांसाठीच असावेत व adults साठी नसावेत का? Q. 2. Introvert असणे हा crime आहे का?? Traits usually we inherit by our parents only right, then if my mother is introvert and father is not then why my father is not ready to accept it as it is???
एक मोठा pause घेत ती बोलत होती…….
मला वाटत ना डाॅक्टर तुम्ही माझ्या बाबाची assessment करा मग तुम्हाला माझ्या कमी बोलण्याची, चिडचिडीची कारणे कळतील… मी माझ्या वर्तनाचा, स्वभावाचा व परिस्थितीचा विचार केलाय व त्यांवर योग्य बदल करायचाही प्रयत्न करते आहे माझ्यापरिने….
But everyone requires some time and personal space to think and adapt with the circumstances.And if we don’t get it then we may start feeling frustrated, irritated…
सतत बाबांचा बेटा Are you happy in India?? हा प्रश्न हे trigger आहे माझ्या बाबाबरोबरच्या अटलेल्या संवादाचे, रागाचे… मला वाटत my parents are only, not accepting the situation and they must be feeling guilty, anxious and insecure……
I am trying my level best for not thinking about my US friends and school life but his question makes me feel irritable.
As relatives pressure is so high here in India parents feel their son/daughter should fulfil the criteria of social communication. I am not denying that it is required but please tell them I am gradually adapting it, I have started going down in our apartment, started making friends over here, but definitely connecting with adults in our family and my grandparents will require some time.
Another important point please ask them to follow the same rules, don’t wear masks and accept each other non-judgementally.
I love them a lot…
हे तिच्या मनातील विचार वावटळ माझ्या मनात मात्र प्रश्नांची उत्तरे शोधत राहिले…
काही झाले तरी तिला तिचा राग योग्य प्रकारे नियंत्रित करायला शिकविणे व बाबा व मुलीमधील नाते, संवाद healthy ठेवण्यास दोघांबरोबर therapy sessions करणे याची गरज होती हे नक्की..
मानसी

Leave a comment